26 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषहरियाणा: रेवाडीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

हरियाणा: रेवाडीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

पंक्चर काढण्याचे काम सुरु असताना एसयूव्ही कारची धडक

Google News Follow

Related

गुरुग्रामजवळील हरियाणातील रेवाडी येथे रविवारी (१० मार्च) रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला.या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दिल्ली सीमेजवळील एका सोसायटीतील रहिवासी होते.हे सर्व राजस्थानमधील खातू श्याम मंदिरात दर्शनासाठी गेले होते.तेथून परतत असताना हा अपघात झाला.या अपघातात चालक विजय, शिखा, पूनम, नीलम आणि रंजना कपूर यांचा मृत्यू झाला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मृत गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीतील हे रहिवासी आहेत.हे सर्व लोक एकमेकांच्या शेजारी राहतात.खातू श्यामचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी इनोव्हा कार बुक करून दिल्लीहून निघाले होते.खातू श्यामचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण गाझियाबादला परत जात होते.तेव्हा रेवाडीहून धरुहेरा रस्त्याने जात असताना मसाणी गावाजवळ त्यांची कार अचानक पंक्चर झाली.त्यानंतर गाडीला रस्त्याच्या कडेला उभी करून पंक्चर काढण्याचे काम सुरु होते.यावेळी काही लोक गाडीच्या बाहेर उभे होते तर काही जण गाडीच्या आतमध्ये बसले होते.त्याच दरम्यान एका एसयूव्ही कारणे जोरदार धडक दिली.

हे ही वाचा..

ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह!

आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात लगबग; पाच दिवसांत ७३० शासन निर्णय जारी

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

दुसरीकडे एसयूव्हीमध्ये प्रवास करणारे लोक रेवाडी शहरातील रेल्वे कॉलनीत एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते.मसाणी गावाजवळ अंधारामुळे एसयूव्हीच्या चालकाला रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार दिसली नाही अन त्याने थेट धडक झाली.या अपघातात एसयूव्हीकारमध्ये प्रवास करणारे ५ जण जखमी झाले आहेत.जखमींमध्ये मिलन, सोनू, अजय, सुनील आणि भोलू यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रेवाडी ट्रामासेंटर दाखल केले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा