27 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषनैनितालमध्ये भीषण रस्ता अपघात, चालकासह आठ जणांचा मृत्यू!

नैनितालमध्ये भीषण रस्ता अपघात, चालकासह आठ जणांचा मृत्यू!

पिकअप २०० मीटर खोल खड्ड्यात पडली

Google News Follow

Related

सोमवारी(८ एप्रिल) रात्री उशिरा नैनितालजवळील बेतालघाट येथे पिकअप २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

नैनितालजवळील बेतालघाट भागातील मल्ला गावात उंचाकोट मोटर रस्त्यावर सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक पिकअप २०० मीटर खोल खड्ड्यात पडली. या अपघातात चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. वाहनात प्रवास करणारे दोन नेपाळी मजूरही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

नेदरलँडवरून आला नुपूर शर्मा यांना फोन

पोलिस स्टेशनचे प्रमुख अनीस अहमद यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा पिकअप खोल खड्ड्यात पडल्याची माहिती मिळाली.यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की, चालक राजेंद्र कुमार (४२, रा. हरिरामचा मुलगा, रा. ओडाबास्कोट), याशिवाय गाडीत नऊ नेपाळी मजूर होते.

परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम आटोपून सर्वजण परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नेपाळी मजुरांची नावे आणि घरे अद्याप समजू शकलेली नाहीत. जखमी झालेले शुद्धीवर आल्यावर उर्वरित माहिती मिळेल, असे पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा