हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद

अस्मिता खेलो इंडिया १७ वर्षांखालील मुलींची बास्केटबॉल स्पर्धा

हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद

माटुंग्याच्या हूपर्स क्लबने कमालीचे सातत्य राखताना अस्मिता खेलो इंडिया १७ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल लीगचे जेतेपद पटकावले.

 

विद्याविहार येथील फातिमा हायस्कूलच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या स्पर्धेत चार संघांच्या ‘सुपर लीग’मध्ये हूपर्स क्लबच्या मुलींनी विद्याविहारचा फातिमा क्लब आणि के. सी. कॉलेजला हरवून सलग दोन विजयांची नोंद केली. डॉमिनिक सॅव्हिओ, अंधेरीविरुद्धचा तिसरा आणि अंतिम राउंड-रॉबिन सामना पावसात वाहून गेला. तीन सामन्यांनंतर ७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि जेतेपदावर नाव कोरले.

फातिमा क्लब आणि डॉमिनिक सॅव्हियो यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. मात्र, हेड-टू-हेड आधारावर फातिमा क्लबला उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. डॉमिनिक सॅव्हियोला तिसरा तर के. सी. कॉलेज संघाला चौथा क्रमांक मिळाला.
तत्पूर्वी, दुसर्‍या राऊंड-रॉबिन लीग सामन्यात, हूपर्स क्लबने फातिमा क्लबवर मध्यंतराला घेतलेल्या १५-११ अशा आघाडीच्या जोरावर ३४-२३ असा सहज विजय मिळवला.

हे ही वाचा:

कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘ नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवणार

धुळ्याचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचे कार अपघातात निधन !

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘ नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवणार

 

आर्या भालेकरने सर्वाधिक १८ गुण मिळवत हूपर्स क्लबच्या सलग दुसर्‍या विजयात मोलाचा वाटा उचलला. आसिया खान (७ गुण) आणि अफजा खान यांनी (६ गुण) तिला चांगली साथ दिली.

 

अन्य लढतीत, अंधेरीच्या डॉमिनिक सॅव्हियोने इलिशा ए. (१२ गुण) आणि अनुष्का एस. हिच्या (११ गुण)सर्वोत्तम खेळाच्या जोरावर  के. सी. कॉलेजचा ३३-२५ असा पराभव केला. वास्तविक पाहता के. सी. कॉलेजकडे मध्यंतराला १६-१२ अशी आघाडी घेतली. मात्र, त्यांना आघाडी राखता आली नाही. पराभूत के. सी. कॉलेजकडून अर्पिता मयेकरने सर्वाधिक ११ गुण मिळवले. सिद्धी दळवीने ८ गुणांसह तिला चांगली साथ दिली.

 

खेलो इंडिया १७ वर्षांखालील मुली बास्केटबॉल स्पर्धेत हूपर्स क्लबच्या आर्या भालेकरला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ म्हणून घोषित करण्यात आले. डॉमिनिक सॅव्हियोच्या त्विशा लक्कशेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर’ म्हणून गौरविण्यात आले.
निकाल – दुसरी राउंड-रॉबिन लीग फेरी: डॉमिनिक सॅव्हियो(इलिशा १२, अनुष्का ११, वेदिका ७) विजयी वि. के. सी. कॉलेज (अर्पिता मयेकर ११, सिद्धी दळवी ८) ३३-२५(मध्यंतर: १६-१२). हूपर्स क्लब (आर्या भालेकर १८, आसिया खान ७, अफजा खान ६) विजयी वि. फातिमा क्लब (जिया सिंग ९, अनुषा राव ६) ३४-२३ (मध्यंतर: १५-११).

Exit mobile version