झिओमारा कॅस्ट्रो या होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. लोकशाही समाजवादी असलेल्या शिओमारा कॅस्ट्रो यांनी गेल्या वर्षीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनेक वर्षांचा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याने ग्रासलेल्या राजवटीचा मुकाबला करण्यासाठी होंडुरासच्या जनतेने कॅस्ट्रो यांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी गुरुवारी प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे.
शपथविधीवेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस याही उपस्थित होत्या. संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष झिओमारा यांचे अभिनंदन केले आणि महिला नेतृत्व आणि समानतेचा उल्लेख केला.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ५१ टक्के मतांचा वाटा आणि तब्बल १.७ दशलक्ष मते जिंकून, कॅस्ट्रो यांनी देशाच्या इतिहासातील सर्वाधिक मते मिळवली आहेत. कॅस्ट्रो ह्या सध्या ६२ वर्षाच्या असून, वयाच्या १९ व्या वर्षी व्यापारी आणि राजकारणी मॅन्युएल झेलाया यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सुरवातीच्या काळात त्यांनी व्यवसाय करत चार मुलांचे संगोपन केले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
पाकिस्तानमध्ये आणखीन एका मंदिराची तोडफोड
एअर इंडिया आली, टाटांच्या पंखांखाली
कॅस्ट्रो यांचे पती माजी अध्यक्ष जोस मॅन्युएल झेलाया यांना २००९ च्या लष्करी उठावात सत्तेतून काढून टाकण्यात आले. आणि कॅस्ट्रोच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या पतीला पुन्हा पदावर आणण्यासाठी २०१३ आणि २०१७ मध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली.
आता कॅस्ट्रो देशाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांनी शक्तिशाली ड्रग्ज तस्करी टोळ्यांचा सामना आणि कठोर गर्भपात कायदे सौम्य करण्याचे जनतेला आश्वासन दिले आहे. तसेच आर्थिक असुरक्षितता, असमानता, भ्रष्टाचार आणि हिंसाचार यासह गरिबीमागील समस्यांवर शिक्कामोर्तब करण्याचे वचन त्यांनी दिले आहे.