हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

केंद्र सरकारचा निर्णय, इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

भारत सरकारने जम्मू-काश्मीर आणि देशाच्या इतर भागात सक्रिय असलेल्या हिज्ब-उत-तहरीर नावाच्या संघटनेवर कठोर कारवाई केली आहे. गृह मंत्रालयाने गुरुवारी (१० ऑक्टोबर) एक राजपत्र अधिसूचना जारी करत हिज्ब-उत-तहरीरला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही संघटना देशातील सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. तसेच तरुणांची दिशाभूल करून, आमिष दाखवून त्यांना आपल्या गटात सामील करून घेत आहे. सरकार हटवून इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

जम्मू काश्मीर निवडणूक तर झाली, पण पाकिस्तानी घुसखोरी भाजपासाठी त्रासदायक!

हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

संतापजनक! दुर्गामातेच्या मूर्तीचे हात ग्राइंडिंग मशिनने तोडले!

शिवाजी मंदिर ट्रस्टवरून महाराव यांची हकालपट्टी करा!

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएच्या कारवाईत हिज्ब-उत-तहरिर संघटना देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. या गटाला बेकायदेशीर प्रतिबंध कायद्यांतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गटाची स्थापना १९५३ मध्ये जेरुसलेम येथे करण्यात आली.

दरम्यान, यापूर्वी तामिळनाडूमध्ये हिज्ब-उत-तहरिर गटाच्या संबंधात अनेक लोकांना अटक करण्यात आली होती, ज्यात तरुणांना कट्टरपंथी बनविण्याचा आणि भारतात इस्लामिक खिलाफत स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा समावेश होता.

Exit mobile version