अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

कोणीही शस्त्रे बाळगताना आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अमित शहा यांनी दिला होता.

अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राज्यव्यापी कोम्बिंग ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील बंडखोरांना शस्त्रे समर्पण करण्याचे आवाहन केल्यानंतर विविध गटांनी सेल्फ-लोडिंग रायफलींसह एके-४७ आणि इन्सास रायफल्ससह १४० हून अधिक शस्त्रे शुक्रवारी सकाळपर्यंत परत केली आहेत. त्याचवेळी इम्फाळ पूर्व जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यातील दोन गावांमध्ये उडालेल्या चकमकीत एका संशयित अतिरेक्यासह दोघे ठार तर, अनेक जण जखमी झाले. इम्फाळजवळील लीमाखॉन्ग येथेही काही समाजकंटकांनी एका घराला आग लावली. दुसर्‍या चकमकीमध्ये एन मोलेन गावातील ४०हून अधिक घरे आणि जवळील टी नात्यांग येथील सुमारे ३० घरे जमावाने जाळली.

फयांग भागात बंदुकीच्या हल्ल्यात आणि बॉम्बस्फोटाच्या घटनेत तिघे जखमी झाले. इम्फाळ पश्चिमेजवळच्या सिंगडा भागात सुरक्षा कर्मचारी आणि संशयित दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक जण जखमी झाला. मणिपूरच्या चार दिवसांच्या दौऱ्यात शाह यांनी गुरुवारी राज्याचे पोलिस दुसऱ्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करतील. अशावेळी कोणीही शस्त्रे बाळगताना आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर कुकी आणि मेईतीसह विविध समुदायातील सुमारे १५० बंडखोरांनी शुक्रवारी सकाळपर्यंत शस्त्रे परत केली, असे पोलिसांनी सांगितले.

या शस्त्रांमध्ये एके मालिकेतील एसएलआर, एम-१६ रायफलींचा समावेश आहे. तसेच, रायफली, लाइट मशीन गन, नऊ मिमीचे पिस्तूल, स्मोक गन आणि अश्रुधुर, स्थानिक बनावटीची पिस्तुले, स्टेन गन आणि ग्रेनेड लाँचर्सचा समावेश आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून हजारो शस्त्रे बंडखोरांनी पळवून नेली होती. राज्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

साक्षी हत्याकांड एकमेव नव्हे लव्ह जिहादची काळी छाया अनेक शहरांवर

ओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष

ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती

केरळ स्टोरीबद्दलची नसिरुद्दीन यांची भूमिका खेदजनक

इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व आणि बिष्णुपूरमध्ये १२ तास; जिरीबाममध्ये आठ तास; थौबल आणि कक्चिंगमध्ये सात तास; चुराचंदपूर आणि चांदेलमध्ये १० तास तास; तेंगनौपालमध्ये आठ तास; कांगपोकपीमध्ये ११ तास आणि फेरझॉलमध्ये १२ तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तामेंगलाँग, नोनी, सेनापती, उख्रुलँड आणि कामजोंगमध्ये संचारबंदी लागू नाही. शुक्रवारपर्यंत, स्थानिक गावांतील सामुदायिक सभागृहांसह २७२ मदत शिबिरांमध्ये ३७ हजार ४५० जणांना ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version