केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेत विरोध दर्शविला. राज्याच्या विधानसभेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित करत देशाचा अपमान झाल्याचे म्हटले. नितीन राऊत यांच्या टीकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला. काँग्रेसने बाबासाहेबांचा केलेला अपमान विसरायचा का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे आता फॅशन झाले आहे, त्यापेक्षा देवाचे नाव घ्या, स्वर्गात जागा मिळेल,’ असा उल्लेख गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेतील भाषणात केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून संसदेच्या बाहेर बाबासाहेबांचे फोटो लावून आंदोलन केले. राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत घोषणाबाजी केली.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?
संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?
बांगलादेशमध्ये जुलैपासून आवामी लीगच्या ४०० नेते, कार्यकर्त्यांचा मृत्यू!
सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर ४ हजार पाकिस्तानी भिकारी नो फ्लाय लिस्टमध्ये
गृहमंत्री शहांनी केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या विधानसभेतही पडसाद उमटले. अशा वक्तव्याने देशाचा अपमान झाला आहे, असे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी म्हटले. यावर आशिष शेलार यांनी प्रत्युतर दिले. शेलार म्हणाले, मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण संदर्भ बघायचा नाही, तेवढाच मुद्दा घेवून बसायचं आणि तेच मंत्री जेव्हा काँग्रेसने बाबासाहेबांचा केलेला अपमान म्हटले कि विसरायचं?. तपासणी शिवाय राज्यसभेतील मुद्यावर याठिकाणी चर्चा करणे कोणत्या कायद्यात बसते, योग्य ती तपासणी करून हे रोकॉर्डवरून काढण्यात यावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.