नीतीश कुमार यांच्यासाठी संकटमोचक ठरले गृहमंत्री अमित शहा!

नित्यानंद यांच्या साथीने रचला अभेद्य व्यूह

नीतीश कुमार यांच्यासाठी संकटमोचक ठरले गृहमंत्री अमित शहा!

नीतीश कुमार यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला खरा, मात्र रविवारी रात्री उशिरा हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी आणि भाजप-जदयूच्या आठ आमदारांनी भाजप आणि जनता दल पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. सरकार वाचवण्यासाठी संख्याबळ मिळवण्यासह राजदला धक्का देण्याची व्यूहरचना रविवारी रात्री उशिरापासून सोमवार सकाळपर्यंत सुरू होती.

विरोधी पक्षांची मोहीम अयशस्वी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधी कर्नाटक आणि नंतर दिल्लीतून मोर्चा सांभाळला. तर, पाटण्यात गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि नीतीश कुमार रात्री उशिरापर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात होते. या दरम्यान जेव्हा मांझी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा रात्री उशिरा आणि सोमवारी सकाळी ते दोनवेळा त्यांच्या घरी पोहोचले.

हे ही वाचा:

कतारमधून भारतीय सकुशल मायदेशी परतण्यामागे मोदी, डोभाल यांचे मोठे पाऊल!

केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!

मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले

रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन

रविवारी रात्री उशिरा राजदचे आमदार नीलमदेवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव यांनाही त्यांच्या गोटात सामील करण्यात यश मिळवले. नीलमदेवी या तुरुंगात कैद असलेल्या बाहुबली अनंतकुमार यांच्या पत्नी आहेत. तर, चेतन आनंद बाहुबली आनंद मोहनचे पुत्र आहेत. जदयूने चेतन यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची आई लवली आनंद यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राजदची सर्व मदार विद्यमान सभापती अवधबिहार चौधरी यांच्यावर होता. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत होताच बाजी पलटली. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत राजगचे आठ आमदार महाआघाडीच्या संपर्कात होते. राजदचा प्रयत्न त्यांच्या आधारावरच सुरू होता. मात्र यातील मनोज यादव, सुदर्शन आणि डॉ. संजीव सकाळी पक्षाच्या संपर्कात आले आणि या दरम्यान राजगने राजदच्या तीन आमदारांना फोडून बाजी मारली.

Exit mobile version