आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, आज सर्वजण होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. होळीच्या या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय देशभरातील विविध सेलिब्रिटी होळीच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी होळीसोबतच रमजानच्या जुम्माच्या नमाजचा दिवसही आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट पोस्ट केली आहे. त्यांनी ट्वीटरवर लिहिले की, ‘रंगांचा सण होळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. आनंदाचा हा सण एकता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देतो. हा उत्सव भारताच्या मौल्यवान सांस्कृतिक वारशाचेही प्रतीक आहे. चला, या शुभ प्रसंगी, आपण सर्वजण भारतमातेच्या सर्व मुलांच्या आयुष्यात सतत प्रगती, समृद्धी आणि आनंदाचे रंग आणण्याची प्रतिज्ञा करूया.”
रंगों के त्योहार होली के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। हर्षोल्लास का यह पर्व एकता, प्रेम और सद्भाव का संदेश देता है। यह त्योहार भारत की अनमोल सांस्कृतिक विरासत का भी प्रतीक है। आइए, इस शुभ अवसर पर हम सब मिलकर भारत माता की सभी संतानों के जीवन में निरंतर…
— President of India (@rashtrapatibhvn) March 14, 2025
हे ही वाचा :
पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेलच्या हाती
भारताने उपटले पाकिस्तानचे कान!
विजापूरमध्ये १७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ९ जणांवर २४ लाख रुपयांचे बक्षीस!
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ट्वीटरवरवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदाने भरलेला हा शुभ सण सर्वांच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा भरणारा जावो आणि देशवासीयांमध्ये एकतेचे रंग अधिक गहिरे करो.”
आप सभी को होली की ढेरों शुभकामनाएं। हर्ष और उल्लास से भरा यह पावन-पर्व हर किसी के जीवन में नई उमंग और ऊर्जा का संचार करने के साथ ही देशवासियों की एकता के रंग को और प्रगाढ़ करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2025