भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे गुरुवारी २६ जानेवारी रोजी निधन झाले. पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चरणजीत यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती.

चरणजीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९९४ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चरणजीत यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे.

पंजाबमधील चरणजीत सिंह यांनी शालेय शिक्षणादरम्यान हॉकी खेळायला सुरुवात केली होती.१९४९ मध्ये चरणजीत हे पंजाब विद्यापीठाच्या हॉकी संघात सामील झाले. त्यांचा उत्तम खेळ पाहून त्यांना विद्यापीठ संघाचा कर्णधार बनवण्यात आले. कालांतराने चरणजीतचे नाव राष्ट्रीय स्तरावर समोर आले. १९५० मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली.

हे ही वाचा:

नितीन राऊतांनी मानसिक आजारावर डॉ. हेडगेवार रूग्णालयात उपचार घ्यावेत!

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..

उत्तराखंडमध्ये राजकीय उलथापालथ…

रोम ऑलिम्पिकसाठी चरणजीत यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने त्यांना विजेतापदाचा सामना खेळता आला नाही. १९६१ मध्ये चरणजीत भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधार बनले. १९६२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचाही ते एक भाग होते. १९६३ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९६४ मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आणि भारताने सुवर्णपदक जिंकले. यानंतर चरणजीत सिंह यांना १९६४ मध्ये सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

Exit mobile version