23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'पावसामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले; अनेक गाड्या, लोक दबल्याची भीती'

‘पावसामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले; अनेक गाड्या, लोक दबल्याची भीती’

प्रशासनाकडून बचावकार्य सुरु

Google News Follow

Related

मुंबईत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली असून वादळीवाऱ्यामुळे वडाळा आणि घाटकोपरमध्ये मोठी होर्डिंग्ज कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.या दुर्घटनेत होर्डिंग्जखाली अनेक गाड्या, लोक दबले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या दुर्घटनेत ३५ जण जखमी झाले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.होर्डिंग्ज कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घाटकोपरमधील आझाद बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर हे होर्डिंग्ज कोसळले आहे.यामध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी अनेक लोक होर्डिंग्जच्या खाली दबले आहेत.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महानगर पालिका आणि मुंबई पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.काही लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही १०० जण अडकल्याची माहिती आहे.अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.या दुर्घटनेत ३५ जण जखमी झाले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, कोसळलेलं होर्डिंग्ज अनधिकृत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हे ही वाचा:

जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त

सुरक्षा दलाकडून गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील पहिल्याच निवडणुकीला मतदारांच्या रांगा!

पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळत असतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग्ज कोसळल्याचे दिसत आहे.यावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, हे होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे आम्ही महापालिकेला सांगितले होते.या होर्डिंग्जसाठी त्याच्या मालकाने आसपासची झाले केमिकल टाकून मारली होती.या होर्डिंग्ज मालकाला लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे.

तसेच वडाळा पूर्व या ठिकाणी असलेल्या श्रीजी टॉवर्सचे पार्किंग स्ट्रक्चर या वादळामुळे खाली कोसळून पडलं आहे.कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली असून या पार्किंग स्ट्रक्चरखाली कामगार आणि रस्त्यावरील नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.यासह ऐरोलीत हाय टेन्शन वायर ब्लास्ट झाल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी लाईट जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तसेच वादळी वाऱ्यामुळे मुलुंड- ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आहे.त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. अचानक अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मुंबईमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी झाडंदेखील उन्मळून पडली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा