27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषHMPV व्हायरस; गोडसे म्हणतायत नो टेन्शन!

HMPV व्हायरस; गोडसे म्हणतायत नो टेन्शन!

नागरिकांना चिंतामुक्त राहण्याचा सल्ला

Google News Follow

Related

जागतिक महामारी कोविड- १९ नंतर आता चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो (HMPV) नावाच्या विषाणूने डोकं वर काढलेलं आहे. दरम्यान, भारतातही HMPV चे तीन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. सहसा हा व्हायरस लहान मुले आणि वृद्धांमध्ये अधिक आढळून येत असल्याचे दिसून आले आहे. या व्हायरसवरून खळबळ उडालेली असताना डॉ. रवी गोडसेंनी मात्र या व्हायरससंबंधी फराशी चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत वास्तव्याला असलेले डॉ. रवी गोडसे यांनी HMPV व्हायरससंबंधी माहितीपूर्ण व्हिडीओ पोस्ट करत नागरिकांना चिंतामुक्त राहण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा एक साधारण तापासारखा व्हायरस आहे. थंडीच्या ऋतूमध्ये हा व्हायरस येतो. आपण त्याला गेली २५ वर्षे परिचित असून ६० वर्षांपासून तो व्हायरस आहे. फार चिंता करण्यासारखा हा व्हायरस नाही. कमी वयाची मुले आणि वृद्ध यांना थोडा या व्हायरसचा त्रास होऊ शकतो. गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. याच्यावर कोणतेही उपचार किंवा यासाठी लस उपलब्ध नाही. यात दिसणाऱ्या लक्षणांवर उपचार करता येतात. आरटीपीसीआर चाचणीने याचे निदान होऊ शकते. योग्य उपचारांसाठी चाचणी केली जाते, असे डॉ. गोडसे म्हणाले.

हे ही वाचा..

प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी आरएसएसचा ‘हरित महाकुंभ’ उपक्रम

वाल्मिक कराडसोबत फोटो व्हायरल; एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी

छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक

कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?

पुढे त्यांनी म्हटले आहे की, HMPV व्हायरसमुळे महामारीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. हा व्हायरस पसरत असला तरी गेली ६० वर्षे तो अस्तित्वात असल्यामुळे त्यासाठीची इम्युनिटी अस्तित्वात आहे. त्यामुळे महामारीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. महामारी १०० वर्षांतून एकदा येते.

दरम्यान, भारतातील बंगळूरूमध्ये आठ महिन्याच्या आणि तीन महिन्यांच्या मुलीला HMPV ची लागण झाली असून गुजरातमध्येही एका दोन महिन्याच्या बाळाला याची लागण झाली आहे. या सर्वांची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा