रोहित शर्माने सन २००७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. रोहित त्याच्या आक्रमक खेळासाठी आणि लांब षटकारांसाठी त्याला क्रिकेटप्रेमींनी ‘हिटमॅन’ ही पदवी बहाल केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. ज्यात रोहित शर्मा एक ऐतिहासिक विक्रम करू शकतो. आजपर्यंत कोणालाही साध्य करता न आलेला पराक्रम करण्यापासून तो अवघ्या काही मैलांवर आहे.
‘हिटमॅन’चे ६ षटकार आणि ६०० पार
रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ५९४ गगनभेदी षटकार मारले आहेत. ६०० षटकार मारण्याचा विक्रम गाठण्यासाठी त्याला केवळ ६ षटकार मारण्याची आवश्यकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात ‘हिटमॅन’ ही कामगिरी करू शकतो. पण त्यासाठी त्याला मोठी खेळी खेळावी लागणार आहे. रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत २६२ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३२३ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर ५८ कसोटीत ८१ षटकार असून १५१ टी-२० सामन्यात त्याच्या नावावर १९० षटकार ठोकण्याचा पराक्रम आहे.
हेही वाचा :
नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात जी एन साईबाबा निर्दोष
बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई
पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!
रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!
जगातील सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित इतर क्रिकेटपटू त्याच्या आजूबाजूलादेखील नाहीत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. वेस्ट इंडिजच्या गेलने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५५३ षटकार ठोकले आहेत. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी तिसऱ्या स्थानावर आहे. ज्याने आपल्या कारकिर्दीत ४७६ षटकार ठोकले आहेत. रोहित आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. पण इतर २ फॉरमॅटमध्ये तो अव्वल स्थानी पोहोचण्यापासून खूप मागे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो का, हे पाहावे लागेल.