टी-२०त ‘हिटमॅन’ने ठोकला ५०० वा षटकार!

टी-२०त ‘हिटमॅन’ने ठोकला ५०० वा षटकार!

हिटमॅन रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ५०० षटकार ठोकणारा रोहित पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. या सामन्यात रोहित शर्माने ३ षटकार ठोकून आपल्या टी-२० कारकिर्दीत ५०० षटकार मारण्याची कामगिरी केली आहे. हिटमॅन रोहित शर्माने २००६ सालापासून आपले दे दणादण खेळीने सिक्सर किंग बनण्यास सुरुवात केली आणि आता १८ वर्षांनंतर तो केवळ भारतच नाही तर आशियातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.

रोहित शर्माने २००६ च्या आंतरराज्य टी-२० स्पर्धेत टी-२० कारकिर्दीतील पहिला षटकार मारला होता. मुंबईकडून खेळताना बडोद्याविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिला षटकार मारला. आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ५०० वा षटकार त्याने मारला आहे. एक गमतशीर गोष्ट रोहितचा पहिला षटकार आणि ५००वा षटकार  दोन्ही सामन्यात अजिंक्य रहाणे खेळत होता.

रवींद्र जडेजाचा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवून रोहितने हा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. रोहित शर्मानंतर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज विराट कोहली आहे. ज्याने आतापर्यंत ३८३ षटकार मारले आहेत. रोहितनंतर सर्वाधिक षटकार मारणारा आशियाई फलंदाज शोएब मलिक आहे, त्याने ४२० षटकार मारले आहेत.

हेही वाचा :

एमएस धोनीने षटकार खेचावा, असे हार्दिक पांड्यालाच वाटत होते का?

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशहा कोण?
रोहित शर्माने आपल्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीत ५०० षटकार पूर्ण केले असले तरी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा आणखी ४ खेळाडू आहेत. आजवर क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत १०५६ षटकार ठोकले होते. या बाबतीत कायरन पोलार्ड (८६०), आंद्रे रसेल (६७८) आणि कॉलिन मुनरो (५४८) अजूनही रोहित शर्मापेक्षा पुढे आहेत.

Exit mobile version