भारताचा सलामीचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने एकशिंगी गेंड्याच्या बचावार्थ आवाहन केले होते.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी फलंदाजीला उतरताना रोहित शर्माने एकशिंगी गेंड्याच्या बचावार्थ आवाहन करणारे बूट घातले होते. या बूटांवर गेंड्याला वाचवा असा संदेश लिहीला होता. याबाबत त्याने फेसबूकवर पोस्ट देखील केली होती.
यामध्ये त्याने क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न आहे. हे जग सर्वांसाठी एक चांगली जागा बनवणे हे माझे ध्येय आहे, आणि हे ध्येय घेऊन मला जी गोष्ट करायला आवडते ते करणे माझ्यासाठी निश्चीत आनंददायक होते अशा आशयाचा संदेश लिहीला आहे.
हे ही वाचा:
एकशिंगी गेंड्याला भारतीय गेंडा या नावाने देखील ओळखले जाते. काही दशकांपूर्वी हा गेंडा नष्ट होण्याच्या काठावर होता. परंतु भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या अथक प्रयत्नानंतर आता या प्राण्याचे संवर्धन होण्यास मदत झाली आहे. कधीकाळी लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला हा प्राणी आता धोक्यात असलेली प्रजाती या स्थानापर्यंत पोहोचला आहे. आता जगात एकूण ३७०० गेंडे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातले बहुसंख्य गेंडे उत्तर भारत आणि नेपाळच्या तराईच्या गवताळ प्रदेशात आढळतात.