आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

इस्त्रायल दूतावासाच्या पत्रानंतर संजय राऊतांचे घुमजाव

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाबाबत संजय राऊतांनी एक पोस्ट शेअर केली होती.ज्यामध्ये हिटलरने ज्यूंच्या विरोधात केलेल्या हत्याकांडाचे समर्थन केले होते.या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी ही पोस्ट डिलीट केली.इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली.यावर संजय राऊत यांनी सांगितले की, मी माझ्या पोस्टमध्ये हिटलरचा संदर्भ दिला होता पण इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता.

‘आर्टिकल १९ इंडिया’ द्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचा व्हिडिओ शेअर केला होता.या पोस्टमध्ये इस्रायली सशस्त्र दलांनी या बाळांच्या इनक्यूबेटरची वीज खंडित केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांनतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी १४ नोव्हेंबर रोजी ‘आर्टिकल १९ इंडिया’ ही पोस्ट रिपोस्ट करत दावा केला की, “हिटलर ज्यू समुदायाचा इतका द्वेष का करत होता? हे आता समजत आहे?”

संजय राऊतांच्या या पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे त्यांना ही पोस्ट तत्काळ डिलिट करावी लागली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली.त्यांनतर इस्रायली दुतावासाने नाराजी व्यक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले.

हे ही वाचा:

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!

हलाल बंदीवर केंद्राकडून अद्याप कोणताही निर्णय नाही, अमित शहा!

एनआयएच्या कारवायांमुळे काश्मीरमधील दहशतवादी हवालदिल!

यावर संजय राऊत म्हणाले की, मी ही पोस्ट शेअर करून खूप दिवस झाले.त्यांनतर मी ती पोस्ट हटवली.मी माझ्या पोस्टमध्ये हिटलरचा संदर्भ दिला होता पण इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता. हमासने दक्षिण इस्रायलवर ज्याप्रकारे हल्ला केला त्यावर मी टीका केली आणि निषेध केला.तथापि, गाझा रुग्णालयांवर ज्या प्रकारे हल्ले केले, नवजात बालकांना मारले आणि त्यांचा जीवनावश्यक पुरवठा रोखला त्याचा मी निषेध केला, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच माझ्या या पोस्टला एका महिना उलटून गेला आहे.यासंदर्भात आता इस्रायली दुतावासाने परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले.मला असे वाटते की, कोणीतरी त्यांना पत्र लिहिण्यास सांगितले असावे, असेही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version