मद्यधुंद काँग्रेस कार्यकर्ता उस्मानने तिघांना चिरडले!

पक्षातून केली हकालपट्टी

मद्यधुंद काँग्रेस कार्यकर्ता उस्मानने तिघांना चिरडले!

जयपूर हिट अँड रन प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी उस्मान खान हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपी नगरसेवक निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’तही आरोपी उस्मान सहभागी झाला होता. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी उस्मान हा जयपूरमधील शास्त्री नगर येथील राणा कॉलनीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली तेव्हा आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता.

या घटनेनंतर जयपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीने आरोपी उस्मान खानची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आरोपीचे अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटोही आहेत. दरम्यान, हिट अँड रन प्रकरणाबाबत जनतेचा रोष वाढत आहे. जयपूरमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. नाहरगड पोलिस ठाण्याबाहेर मोठा निषेध सुरू आहे. संतप्त जमाव टायर जाळून निषेध करत आहे. रस्त्यांवर जाळपोळ झाली. आरोपी उस्मान खानला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

वक्फ कायदा : जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ

वाईट जीनमुळे फुफ्फुसांमध्ये भोक होण्याचा धोका!

भारताचा फिनटेक स्टार्टअप इकोसिस्टम फंडिंग मिळवण्यात तिसऱ्या क्रमांकावर

संयुक्त अरब अमिरातच्या उपपंतप्रधानांच्या भारत दौऱ्यातून काय साध्य होणार ?

ही घटना सोमवारी (७ एप्रिल) रात्री ९:३० च्या सुमारास घडली. आरोपी उस्मान खानने आपल्या एसयूव्ही कारने ७ ते ८ लोकांना उडवले. या घटनेत तिघेजण गाडी खाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये ५० वर्षीय ममता कंवर आणि ३७ वर्षीय अवधेश पारीक यांचा जागीच मृत्यू झाला, तर वीरेंद्र सिंग नावाच्या आणखी एका तरुणाचा सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा चुथडा कुणी केला? | Mahesh Vichare | Deenanath Mangeshkar Hospital

Exit mobile version