‘शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत’ यांच्याकडून आयोजित करण्यात आलेले “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यान आणि हेमाद्री अंक – १३ मोडी हस्तलिखिताचा प्रकाशन” सोहळा शनिवारी (२१ डिसेंबर) मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे (पश्चिम) येथे पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी सुर्वे (सह संपादिका -हेमाद्री अंक) यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले. अश्विनी सुर्वे यांनी अभयजी जगताप (शिव शंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक) यांचा परिचय करून दिला. सुनील कदम (इतिहास अभ्यासक व मोडी लिपी प्रशिक्षक) हे देखील उपस्थित होते.
अहिल्यादेवीचें समाजकार्य असो, त्यांची प्रशासन व्यवस्था असो, त्यांनी बंद केलेली सती प्रथा असो, उद्ध्वस्त देवळांच्या पुनर्निर्माणाचे कार्य असो अशा अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांचे जीवनदर्शन उलगडून सांगितले सुरेख असे व्याख्यान अभयजी जगताप यांनी सादर केले. पंकज भोसले यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला.
हे ही वाचा :
भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता
सुप्रिया ताई गोवारी हत्याकांड विसरलात का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा यशस्वी प्रारंभ
मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवण्यापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य अन्यथा होणार कारवाई!
अभय जगताप यांनी प्रमुख पाहुणे दिलीप बलसेकर (कार्यकारी संपादक व सचिव, दार्शनिक विभाग, महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागार, माजी संचालक) यांचा शाल, श्रीफळ, बोधचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘हेमाद्री अंक – १३ मोडी हस्तलिखिताचे प्रकाशन’ दिलीप बलसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बलसेकर यांनी त्यांच्या काही आठवणी व उद् बोधपर भाषण केले.