22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषभारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला...

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

१० मीटर एअर पिस्तुलमध्ये दमदार कामगिरी

Google News Follow

Related

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसऱ्या पदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक पटकावले आहे. यासोबतच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने कांस्य पदक जिंकवून दिलं आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावलं आहे. या पदकासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.

स्पर्धेच्या फेऱ्या

  • पहिली फेरी-

भारत- १८.८

दक्षिण कोरिया- २०.५

  • दुसरी फेरी-

भारत-२१.२

दक्षिण कोरिया- १९.९

  • तिसरी फेरी-

भारत- २०.८

दक्षिण कोरिया- १९.८

  • चौथी फेरी-

भारत- २०.७

दक्षिण कोरिया- २०.५

  • पाचवी फेरी-

भारत- २०.१

दक्षिण कोरिया- १९.५

  • सहावी फेरी-

भारत- २०.२

दक्षिण कोरिया- २०.६

वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तुलमध्येही मनू भाकरला यश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे पदकांचे खाते मनू हिने खोललं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.

हे ही वाचा:

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

हावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील एकमेव खेळाडू

१९०० नंतर थेट २०२४ एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली आहे. १९०० च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. पुढे सुशील कुमार (कुस्ती) आणि पी व्ही सिंधू (बॅडमिंटन) यांनी भारतासाठी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा