भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने नवे यश संपादन केले आहे. शुक्रवार, २२ मार्च रोजी इस्रोने आपल्या ‘पुष्पक’ या रियुजेबल लाँच व्हेईकलची (RLV) चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्गाजवळील चल्लाकेरे येथे असणाऱ्या एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी ७.१० च्या सुमारास ‘पुष्पक’चे यशस्वी लँडिंग झाले. प्रक्षेपणस्थळी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इस्रोने ऐतिहासिक यश मिळवलं असून हे पुष्पक विमान ऑटोमॅटिकली सुरक्षितपणे लँड झालं. पुष्पकचे यशस्वी प्रक्षेपण हे अंतराळातील वावर अधिक परवडणारा आणि टिकाऊ बनवण्याच्या दिशेने भारताचा एक धाडसी प्रयत्न आहे, असं म्हटलं जात आहे. ‘पुष्पक’ला भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने ४.५ किमी उंचीवरून सोडले. धावपट्टीपासून ४ किमी अंतरावर आल्यानंतर पुष्पक स्वतः धावपट्टीजवळ आला आणि अचूकपणे उतरला. तसेच स्वतःचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून तो योग्य ठिकाणी थांबला, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.
पुष्पक- RLV हे पूर्णपणे पुन्हा वापरता येण्याजोगे सिंगल-स्टेज-टू-ऑर्बिट (एसएसटीओ) वाहन म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. ज्यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. एका दशकाहून अधिक काळ या प्रकल्पावर काम सुरू होते. या प्रकल्पाची मागील वर्षी एप्रिलमध्ये यशस्वी चाचणी झाली होती. तेव्हा भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सोडल्यानंतर या वाहनाने स्वायत्त लँडिंगचे प्रदर्शन केले होते. यामुळे इस्रोला आणि भारताला मोठी उपलब्धी झाली आहे. रामायणातील पौराणिक ‘पुष्पक विमान’ या नावावरून या वाहनाला नाव देण्यात आले असून इस्रोचे आधुनिक काळातील विमान समृद्धी आणि नावीन्यपूर्णतेचे प्रतीक आहे.
ISRO has achieved a major milestone in the area of Reusable launch vehicle (RLV) technology, through the RLV LEX-02 landing experiment, the second of the series, conducted at Aeronautical Test Range (ATR), Chitradurga in Karnataka this morning at 7:10 am. Pushpak (RLV-TD), the… pic.twitter.com/HyCIbXZPwO
— ANI (@ANI) March 22, 2024
१०० कोटींहून अधिक गुंतवणुकीसह, हा प्रकल्प केवळ भारताच्या तांत्रिक उप्लाब्धीचे प्रदर्शन करत नाही तर २०३५ पर्यंत भारतीय अंतरीक्ष स्थानक स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला अधोरेखितसुद्धा करतो. गेल्या महिन्यात विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी या वाहनाच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली होती.
हे ही वाचा:
चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार
केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला
केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!
ब्रेन चीप यंत्राचा वापर करून अर्धांगवायू झालेल्या रुग्णाने बुद्धिबळ खळले
‘पुष्पक’चा फायदा काय?
पुष्पक हे रियुजेबल लाँच व्हेईकल आहे म्हणजेच पुन्हा वापर करता येणारे लाँच व्हेईकल. हे तयारी करून यशस्वी चाचणी केल्यामुळे अंतराळ मोहिमांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. लाँच व्हेईकलमध्ये असणारी यंत्रे, पार्ट्स अत्यंत महागडे असतात. आतापर्यंत एकदा प्रक्षेपित केलेलं यान पुढे अंतराळातच सोडून द्यावं लागत होतं. मात्र, आता या चाचणीनंतर हे यान पृथ्वीवर पुन्हा आणता येणार आहे. शिवाय या रियुजेबल लाँच व्हेईकचा फायदा केवळ इस्रोलाच होईल असं नाही तर हे वाहन पुन्हा पृथ्वीवर आणता येणं शक्य झाल्यामुळे अंतराळातील कचरा देखील कमी होण्यास मदत हिणार आहे.