हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला आहे. आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. तसेच आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही असे बावनकुळे म्हणाले.
ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, या कार्यक्रमावरून उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. हे काय सौगात ए मोदी नाही तर हे सौगात ए सत्ता असल्याचे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचे एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे, भाजपने जाहीर करावे असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला २४ तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले?, असा सवाल बावनकुळे उपस्थित केला.
हे ही वाचा :
नागपूर हिंसाचार -बांगलादेश कनेक्शन? मुंबईत एका बांगलादेशीला अटक
ज्यांना गौमातेची दुर्गंधी येत असेल, त्याने सनातनचा अपमान करता येईल, अशी भूमी शोधावी!
सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला
इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू!
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही.
गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोकं उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत, असे बावनकुळे म्हणाले.
हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले. 1/4
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 27, 2025