वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात असलेल्या व्यासजींच्या पूजेला परवानगी दिली आहे.वाराणसी कोर्टाने जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या सात दिवसात पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या निर्णयानुसार हिंदूंना ज्ञानवापी तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.
ज्ञानवापी मशिदी संबंधित वेगवेगळ्या खटल्याची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुरु आहे.या दरम्यान मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी बुधवारी वाराणसी कोर्टाने परवानगी दिली आहे.त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला असून हिंदूंना आता व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.येणाऱ्या सात दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.तसेच काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्डाने नेमलेले पुजारी येथे पूजा करतील, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाकडून लोखंडाचे बॅरिकेडस लावण्यात आले होते.हे बॅरिकेंडिग हटवून पूजेसाठी मार्ग तयार करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
राम मंदिराचे स्वप्न साकार,तिहेरी तलाक,गरिबांना कायम स्वरूपी घरे; राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण!
क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!
हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!
प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक
मागील आठवड्यात कोर्टाच्या आदेशानुसार व्यासजींच्या तळघराच्या चाव्या डीएमने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. हिंदू पक्षाचे वकील आजची घटना राममंदिराचे दरवाजे खुले करण्याच्या घटनेसारखी मानत आहेत. या तळघरात १९९३ पूर्वी पूजा होत असे असं सांगितलं जात.अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाने लोखंडाचे बॅरिकेंडिग लावले होते. त्यामुळे या तळघरात जाणे शक्य नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचा परिवार ज्ञानवापीच्या तळघरात नियमित पूजा करत असे.लोखंडाचे बॅरिकेडस लावल्यामुळे तेथे लोकांचे येणे-जाणे बंद झाले आणि पूजाही बंद झाली.त्यानंतर पूजा पुन्हा सुरु व्हावी यासाठी व्यास यांचे नातू शैलेंद्र व्यास यांनी कोर्टात धाव घेतली. १९९३ पासून तळघरात पूजा बंद झाली आहे, असे शैलेंद्र व्यास यांनी याचिकेमध्ये म्हटले होते.सध्या हे तळघर अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
परंतु, वाराणसी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता याठिकाणी पुन्हा पूजा सुरु होणार आहे.