25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!

मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!

हिंदू तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी मुस्लिम कुटुंबावर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

मुंबईतील मीरा रोड परिसरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे वारंवार लैंगिक शोषण करून तिच्यावर धर्म बदलण्याची सक्ती लादत असल्याची घटना नुकतीच समोर आली होती.आरोपी मोहसीन शेख याने तरुणीला बिर्याणी खाऊ घालून बलात्कार केला होता.या प्रकरणी पीडित तरुणीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी रविवारी (२८ एप्रिल) आरोपीला अटक केली आहे.पीडित तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीच्या कुटुंबियांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी मोहसीन शेखने २०२३ साली गणेशोत्सवाच्या वेळी पीडितेची भेट घेतली आणि तिच्याशी मैत्री केली होती. काही दिवसांच्या सामान्य संवादानंतर, त्याने मुलीला प्रपोज केले आणि तुझावर खूप प्रेम असून तुझ्यासोबत आयुष्य घालावयाचे आहे, असे आरोपीने सांगितले.परंतु, पीडितेने त्याला साफ नकार दिला आणि फक्त मैत्री राखण्यात रस असल्याचे तिने त्याला सांगितले.

आरोपीने पीडितेचा दृष्टिकोन समजून घेण्याचे नाटक केले आणि तिच्याशी मैत्री करण्याचे मान्य केले. मात्र, तो एके दिवशी तिच्या घरी गेला आणि त्याने पीडित तरुणीला बिर्याणी खाऊ घातली, ज्यामध्ये गुंगीचे औषध घातले होते.मैत्री खातर बिर्याणी खाल्ली.त्यानंतर, मला चक्कर येऊ लागली आणि काही वेळाने मी उठल्यावर, मी स्वतःला बेडरूममध्ये पाहिले, माझ्या अंगावर कपडे नव्हते. आरोपी मोहसीनला याबाबत विचारले असता त्याने म्हटले, ‘ सॉरी जो हो गया, सो हो गया’, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासोबत लग्न करेन, असे आश्वासन देऊन तो निघून गेला.

हे ही वाचा:

अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

देवेगौडांचे पुत्र आणि नातवाविरुध्द लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा

मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!

या घटनेनंतर आरोपी पुन्हा घरी आला आणि मला ब्लॅकमेल करत अगोदरच्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत धमकी दिली.त्यानंतर आरोपीने धमकी देत वारंवार माझे लैंगिक शोषण केले.इस्लाम धर्म स्वीकारल्यास लग्न करेन, असे आरोपी तरुणीला सांगत असे.तिने पुढे सांगितले की, आरोपी तिला बळजबरीने काही मशिदीत घेऊन गेला आणि अनेकदा तिला काही द्रव प्यायला देत असे. मुलीने त्याला नकार दिल्यास तो तिला मारहाण करायचा. आरोपीने मुलीचे १,२०,००० रुपये आणि सुमारे १,६०,००० रुपये किमतीचे सोने लुटल्याचेही तक्रारीत सांगितले आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांस याबाबत माहिती दिल्यानंतर सुरवातीला त्यांनी लग्नाला मंजुरी दिली.मात्र, नंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिला मारहाण केली.त्यानंतर तरुणीने तात्काळ पोलिसांना मदतीसाठी बोलावले आणि नंतर नयानगर पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली, असे पीडित तरुणीने तक्रारीत सांगितले.

या तक्रारीवरून आरोपी मोहसीन शेख, इम्रान बागवान, जाफर शेख, मोबीन शेख, अशफाक शेख आणि शाहजान शेख यांच्याविरुद्ध कलम ४२०, ३७६(२)(एन), ३१३, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी मोहसीनला अटक करण्यात आली असून केवळ आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलीशी संबंध ठेवल्याचे त्याने कबूल केले आहे.या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा