बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!

हिंदूंकडून संताप व्यक्त

बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!

बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक विशेषतः हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. अशा घटनांविरुद्ध युनुस सरकार कोणतीही कठोर कारवाई करताना दिसत नाहीयेत. हिंदुंवरील अत्याचाराविरोधात राज्यासह देशात निदर्शने, आंदोलने होत आहेत. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपल चक्रबर्ती असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू युवकाचे नाव आहे. कट्टरवाद्यांकडून ही हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, कट्टरवाद्यांनी युवकाचा जीव जाईपर्यंत त्याच्या घरासमोरील झाडावर लटकवले. सोशल मिडीयावर या घटनेचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरून हिंदू समाजाने संताप व्यक्त केला आहे.

ही घटना ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील नबीनगर पोलीस ठाणे भागातील आहे. विशेष म्हणजे, हिंदू युवक झाडावर लटकला असताना रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी बघ्याची भूमिका बजावली. या प्रकरणी पोलीस कारवाई करत असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांकडून अशी कोणतीच कारवाई माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा : 

मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा

संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!

जम्मू काश्मीरात मारले गेलेले ६० टक्के दहशतवादी ‘पाकडे’

संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!

दरम्यान, बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदुंवरील अत्याचारा विरोधात भारत सरकारने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशासह इतर देशांनी अशा घटनांविरुद्ध निषेध केला आणि बांगलादेश सरकारकडे कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

 

Exit mobile version