तस्लिमा नसरीन संतापल्या, मोहम्मद युनूसना हाकला!

ट्वीटकरत केली मागणी 

तस्लिमा नसरीन संतापल्या, मोहम्मद युनूसना हाकला!

बांगलादेशातील हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून ठार मारण्याच्या घटनेवरून बांगलादेश आणि भारतात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भारताने या घटनेला घृणास्पद म्हटले आहे आणि बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांची, विशेषतः हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांना सत्तेवरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. मोहम्मद युनूस सरकार गेल्यावरच बांगलादेशात हिंदू टिकून राहतील असे तस्लिमा नसरीन म्हणाल्या आहेत.

भावेश चंद्रा यांच्या क्रूर हत्येवरून लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि त्यांना मारहाण करून ठार मारण्यात आले. मारेकरी कोण आहेत याचा आपण निश्चितच अंदाज लावू शकतो.

युनूस हिंदूंच्या मारेकऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. ते असा प्रचार करतात की हिंदू ठीक आहेत आणि हिंदूंवर होणाऱ्या छळाच्या सर्व बातम्या खोट्या, अफवा आहेत किंवा भारताने बनवलेल्या आहेत. जर युनूस यापुढे सत्तेत राहिले तर देश लवकरच हिंदूंपासून मुक्त होईल. हिंदूंना वाचवण्यासाठी युनूसला सत्तेवरून काढून टाकले पाहिजे,’ असे तस्लिमा नसरीन म्हणाल्या.

हे ही वाचा : 

मार्करमने दाखवला शानदार खेळ

चिकूमुळे हाडं होतात मजबूत, कमजोरीही राहते दूर

जेईई मेन्सचा टॉपर ओमप्रकाशला लोकसभा अध्यक्षांकडून शुभेच्छा

टँकर माफियांचा अंत करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणार

दरम्यान, बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील एका प्रमुख हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ढाक्यापासून सुमारे ३३० किमी वायव्येस असलेल्या दिनाजपूरमधील बासुदेवपूर गावातील रहिवासी ५८ वर्षीय भावेश चंद्र रॉय यांचे दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या घरातून अपहरण केले आणि त्यांची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण झाल्यानंतर काही तासांत त्यांचा मृतदेह सापडला. भावेश चंद्र रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष आणि परिसरातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते होते. भावेश चंद्र रॉय यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

उद्धव यांच्या अटी मनसैनिकांना कुठे पटतायत ? | Amit Kale | Raj Thackeray | Uddhav Thackeray |

Exit mobile version