देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली.देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी व्ही नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली.यानंतर आता राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.
हे ही वाचा..
जाडेजाचे वडील म्हणतात, त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं
निखिल वागळेंविरोधात गुन्हा दाखल
पाकिस्तान्यांनी दहशतवाद्याला नाकारलं; हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव
अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा.
स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.