शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधम अय्याज काझीचे खोके उद्ध्वस्त

हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधम अय्याज काझीचे खोके उद्ध्वस्त

राजवाडा परिसरात अय्याज रियाज काझी या युवकाचा महाराष्ट्र टी स्टॉल या नावाने खोके व सरबतचा गाडा आहे. या खोक्यावर उभा राहून राजवाड्यामधून शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या लहान अल्पवयीन शाळकरी मुलीची तो अश्लील हावभाव करून छेडछाड करून फ्लाईंग किस देत असल्याच्या तक्रारी होत्या. या त्रासाला कंटाळून पेठ भागातील काही मुलींनी आपल्या आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्यावर विविध प्रकारची कलमे लावून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या लव्ह जिहादी मनोवृत्तीच्या नराधमाचे खोके राजवाडा परिसरातून हटवा व हिंदूंच्या मुली वाचवा यासाठी हिंदू एकता आंदोलनाने आंदोलन करायचा निर्णय घेतला. त्यानंतर या आंदोलनाच्या धसक्याने सांगली गणपती संस्थांच्या व्यवस्थापनाने रातोरात या अय्याज काझीचे खोके उद्ध्वस्त करून तेथून हटवले. त्या परिसरातील खोके धारकांनी अय्याझ काझीच्या या कृत्याचा निषेध म्हणून खोके बंद ठेवून हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. अय्याज काझी मुर्दाबाद, अय्याज काझी याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिक: थाळीफेक ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले !

माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून अपघात; दोन महिला यात्रेकरूंचा मृत्यू

मराठवाड्यात पूर, ५०-६० गावांचा नांदेडशी संपर्क तुटला !

‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?

आक्रमक हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तेथील खोके ठेवलेला त्याचा कट्टा उध्वस्त करून टाकला. यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, या अय्याज काझीचे वकीलपत्र सांगलीतल्या कोणत्याही वकिलाने घेऊ नये. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याने यापूर्वी घरातील दोन लाख रुपये चोरून बायकांच्या वरती उधळलेले आहेत. तो सुटून आल्यानंतर पुन्हा खोका सुरू करून हिंदू मुलींची छेडछाड करू शकतो म्हणून सांगली गणपती संस्थांनने या परिसरात त्याला पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये, त्यांना जर व्यवसाय सुरू केला तर हिंदू एकता आंदोलनचे कार्यकर्ते त्याचे खोके उध्वस्त करतील आणि याचे खोके बसवण्यासाठी कोणत्याही दबावाला संस्थांनने भीक घालू नये.

यावेळी मनोज साळुंखे यांनी आभार मानले. तसेच यावेळी हिंदू एकता आंदोलनचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव खणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, नारायण हांडे, संभाजी पाटील, नंदू यादव, सुजित पाटील, संदेश खोत, पै.प्रदीप निकम, राहुल कातार, गजानन मोरे, ब्रिजेश शर्मा, श्रीराम अलकुटे, संदीप सूर्यवंशी, दिग्विजय शिंदे, अरुण वाघमोडे, अरुण जोशी, शुभम खोत, इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने हिंदू एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version