मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व स्टेशन परिसरात शनिवार (२६ एप्रिल) रात्री पहलगाममधील इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात हिंदू संस्थांकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनावर मुस्लिम जमावाने हल्ला केला. हिंदू समाजाचे हे आंदोलन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासाठी आणि शोक व एकजूट व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. मात्र, मुस्लिम जमावाने पाकिस्तानचा झेंडा व पॅलिस्टिनी झेंड्यावरून आंदोलकांवर हल्ला केला. पोलिसांनी या घटनेशी संबंधित १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, ३ जणांना अटक करण्यात आली आहे. हाणामारीदरम्यान एका हिंदू युवकाच्या डोक्यावर प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले गेले आहे. हल्ल्याच्या वेळी हिंदू समाजाकडून बचावात्मक कारवाई करण्यात आली, असे सांगण्यात येते.
माहितीनुसार, हे आंदोलन २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयोजित करण्यात आले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू धर्मीयांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये २५ भारतीय हिंदू आणि एक नेपाळी हिंदू होते. या हल्ल्याची जबाबदारी “द रेसिस्टन्स फ्रंट” (TRF) या लष्कर-ए-तोयबाचा सहयोगी गटाने घेतली होती, जरी नंतर त्यांनी आपला दावा मागे घेतला.
हे ही वाचा:
अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह दोन वर्ष ठेवला कपाटात!
पाकिस्तानने अफगाणिस्तानात लढलेल्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवले!
पहलगाम हल्ला : काँग्रेसचे नेते राशिद अल्वी म्हणतात हा फाळणीचा परिणाम
‘केसरी चॅप्टर २’ ची प्रशंसा करताना शशी थरूर यांची टिप्पणी काय ?
वाकोला येथे झालेल्या आंदोलनात सकल हिंदू समाज व विविध हिंदू संस्थांनी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली व दहशतवादाविरुद्ध संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान पाकिस्तान व पॅलेस्टाइच्या झेंडे चप्पलांनी तुडवले. या घटनेवरून मुस्लिम जमाव आक्रमक झाला आणि एका हिंदू युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
यासोबतच पॅलेस्टाइनमध्ये इस्लामिक मस्जिद असल्याचा हवाला देत मुस्लिम जमावाने पॅलेस्टाइनच्या झेंड्यावर केलेल्या वागणुकीवर आक्षेप घेतला. पहलगाम हल्ल्याच्या आधी पॅलेस्टाइन दहशतवादी गट हमासने काश्मीरमध्ये दहशतवादाला पाठिंबा देत पाकिस्तान दौरा केला होता. २२ एप्रिलचा हल्ला हमासच्या पद्धतीने करण्यात आल्याचे सांगितले जाते.
घटनेची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले आणि जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या १५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे संयुक्त पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या परिस्थिती पूर्णतः शांत आहे.” पोलिस प्रशासनाने वाकोला आणि आसपासच्या भागात अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आहे.
ही पहिलीच वेळ नाही की मुस्लिम समुदायाकडून पाकिस्तानच्या झेंड्याबाबत प्रेम व्यक्त केले गेले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चातही “पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच विविध ठिकाणी पाकिस्तानच्या झेंड्याच्या विटंबनेवर भारतीय मुस्लिमांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला, मात्र पहलगाम हल्ल्यात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात असा संताप दिसून आला नाही.