पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यावर नुकतीच ईडीने मोठी कारवाई केली होती. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पैलवान अभिजीत कटके यांचे काही आर्थिक व्यवहार मंगलदास बांदल यांच्याशी होते.
हे ही वाचा :
क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द
पंजाब दहशतवादी कट प्रकरण: दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रमुख साथीदारावर आरोपपत्र दाखल
…म्हणे मंदिरातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण वाढते!
बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया
या प्रकरणी ईडीने अभिजीत कटके यांच्या पुण्यातील वाघोली येथील निवासस्थानी पथकाने धाड टाकत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईत पथकाच्या हाती काय लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, कोथरुडमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अमोल बालवडकर बंडखोरीच्या तयारीत आहेत. या ठिकाणी पक्षाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, कदाचित या कारणामुळे ईडीची कारवाई होत आहे का?, अशी चर्चा देखील होत आहे.