उत्तर प्रदेश, बिहारमधून तमिळनाडूत येणारे हिंदीभाषिक येथे बांधकामाच्या ठिकाणी तरी काम करतात किंवा रस्त्यांची आणि शौचालयांची स्वच्छता करतात,’ असे वादग्रस्त वक्तव्य द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. द्रमुक खासदाराच्या या वक्तव्याची क्लिप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी शेअर केली आहे. तसेच, इंडिया गटाच्या नेत्यांनी या वक्तव्याबाबत मौन धारण केल्याबद्दल टीका केली आहे.
मारन हे या चित्रफितीत इंग्रजी आणि हिंदी बोलणाऱ्यांची तुलना करताना दिसत असून इंग्रजी शिकणारे आयटी कंपन्यांत नोकरी करतात. तर, हिंदी बोलणारे बांधकाम, स्वच्छता अशी कनिष्ठ दर्जाची कामे करताना दिसतात, असे मारन बोलताना दिसत आहेत. या चित्रफितीनंतर देशवासीयांमध्ये जात, भाषा आणि धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेहजाद पुनावाला यांनी इंडिया गटावर केला आणि द्रमुक खासदारांच्या या वक्तव्यावर मौन बाळगल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली.
हे ही वाचा:
‘बृजभूषण यांचा निकटवर्तीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही’
‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!
इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला
न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका स्वीकारून राज्यातील जनभावनेचा आदर राखला
‘पुन्हा एकदा फोडा आणि राज्य करा, हे सूत्र वापरले जात आहे,’ असे पुनावाला यांनी एक्सवर नमूद केले आहे. दयानिधी मारन यांचे हे वक्तव्य दुर्दैवी असून अन्य नेत्यांची कृती पाहिल्यास त्यांचे हे विधान येणे हा योगायोग नाही, अशीही टीका केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील इंडिया गटाचे नेते याबाबत शांत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू यादव, काँग्रेस, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव असे भासवत आहेत का की असे काहीच घडत नाही? ते या प्रकरणी कधी बाजू घेतील?, असा प्रश्न पुनावाला यांनी उपस्थित केला आहे.
याआधी द्रमुकचेच खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार यांनी हिवाळी अधिवेशनात हिंदी पट्ट्यातील राज्यांवर टीका केली होती. ही ‘गोमूत्र’ राज्ये कधीच दक्षिणेकडे सत्त मिळवू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्यावरही काहीच कारवाई झाली नाही, याची आठवण पुनावाला यांनी यावेळी करून दिली.