राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. फलोदीमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तसेच, जयपूर हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार. पुढील तीन दिवसांत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. तसेच, तीव्र उष्णतेच्या लाटांसह तीन ते चार दिवस राजस्थानात गरम हवा वाहणार आहे. तर, २९ मे मध्ये पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानच्या काही भागांत तीव्र उष्णतेच्या लाटा वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील किमान तापमानात ३१.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. नागरिकांना सकाळपासूनच उन्हामुळे उष्म्याचा त्रास जाणवत आहे. सदैव उष्मा जाणवत असल्याने अनेकजण घराबाहेर पडणेही टाळत आहेत. मात्र या परिस्थितीतून पुढील तीन-चार दिवसही आराम मिळण्याची शक्यता कमी आहे. मान्सून येण्याची शक्यता कमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून १ जूनपर्यंत केरळ पोहोचण्याची शक्यता आहे. तर, राजस्थानवासींना मान्सूनसाठी आणखी वाट पाहावी लागेल. सर्वसाधारणपणे मरुधरामध्ये मान्सून २५ जूनपर्यंत दक्षिण-पूर्व राजस्थानमध्ये प्रवेश करतो. ८ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सून आगमन करेल.
हे ही वाचा:
‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!
सराफा व्यावसायिकांवर छाप्यात २६ कोटींची रोकड, ९० कोटींचे बेहिशेबी दस्तावेज जप्त!
पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाचा आरोप करत जमावाचा ख्रिश्चनांवर हल्ला!
चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!
जूनअखेरपर्यंत मिळेल दिलासा
गेल्या वर्षीचा अंदाज पाहिल्यास सर्वांना आणखी २० दिवस उष्म्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षीसारखा पाऊस यंदाही राजस्थानात योग्य वेळी आला तर, राजस्थानवासींना दिलासा मिळेल. त्यामुळे राजस्थानवासींना जून अखेरच्या आधी तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. जूनअखेपर्यंतच राजस्थानमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे.