महामार्ग बांधणीचा वेग २०१४-१५ मध्ये १२ किमी प्रतिदिन होता, तो आता वाढून ३४ किमी प्रतिदिन या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचला आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकात हा एक टप्पा असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात सुमारे १२,२०५.२५ किमी लांबीचे महामार्ग बांधून मैलाचा दगड गाठला आहे. दरदिवशी ३४ किमी या गतीने बांधकाम करून हे लक्ष्य गाठण्यात आले. सध्याच्या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या ११,००० किमीच्या लक्ष्यापेक्षा हा आकडा १,२०५ किमीने जास्त आहे.
हा आकडा फार महत्त्वाचा आहे. कारण या आर्थिक वर्षातील पहिले काही महिने राष्ट्रीय पातळीवरील टाळेबंदीत गेले होते. त्यामुळे बांधकामक्षेत्रावर वाईट परिणाम झाला होता. असे या पत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार
सचिन वाझेचे बनावट आधार कार्ड ताब्यात
‘या’ दिवसापासून पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना मिळणार लस
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील आर्थिक वर्षासाठी ४० किमी प्रतिदिनचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याबरोबरच मंत्रालयाने बांधकााचा वेग वाढवण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे.
मंत्रालयाने सध्या काही बदल अंगीकारले आहेत. त्यामुळे बांधकामाचा वेग वाढला आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सर्वात जास्त ₹१.१८ लाख कोटींची रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली होती.