दिल्लीत जानेवारी महिन्यात ३२ वर्षांत सर्वाधिक पाऊस…

दिल्लीत जानेवारी महिन्यात ३२ वर्षांत सर्वाधिक पाऊस…

दिल्लीत या वर्षी जानेवारी महिन्यात जवळपास ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जो गेल्या ३२ वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे. काल रात्रीपर्यंत दिल्लीत रात्री ९.३० पर्यंत ६९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही माहिती भारत हवामानशास्त्र विभागने दिली आहे.

जानेवारी १९८९ दिल्लीत ७९.७ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. त्यानंतर काल उच्चांकाची नोंद झाली आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी झालेल्या पावसाने कमाल तापमान १४.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले, जे सरासरीपेक्षा सात अंशांनी कमी आणि हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. संध्याकाळी ५.३० वाजता सापेक्ष आर्द्रता ८४ टक्के नोंदवली गेली आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता काल “अत्यंत खराब” श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.
आज हलक्या पावसाची शक्यता

२१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज हलका पाऊस किंवा रिमझिम पावसासह ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे १६ आणि १० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका

पाच राज्यांमधील रॅली आणि जाहीर सभांवर ‘या’ तारखेपर्यंत बंदी

नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन

ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द

 

दहा बारा दिवसांपूर्वी दिल्लीत १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने दोन वर्षातील सर्वात थंड दिवस दिल्लीकरांना अनुभवायला मिळाली होती. त्यादिवशी सफदरजंग येथे कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी होते. तर शहरातील अनेक भागांना कडाक्याची थंडी सहन करावी लागली होती. यामध्ये नरेला, जाफरपूर, पालम, रिज आणि आयानगर इथे १५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली होती.

Exit mobile version