दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार

मेट्रो मार्गिकेची लांबी ३२ किमीची आहे

दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो कॉरिडॉरच्या भूमिगत मार्गिकेमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल (T2) मेट्रो स्टेशनमध्ये देशातील सर्वात उंच एस्केलेटर बसवले जाणार असून, ते दिल्ली येथील जनकपुरी-वेस्ट या मेट्रो स्टेशनच्या आजवरच्या राष्ट्रीय विक्रम असलेल्या १५.६ मीटर उंचीला मागे टाकतील.

कसा आहे हा मार्ग?

बांधकाम चालू असलेला हा मार्ग मेट्रो ३ या मार्गिकेचा, ३२.५ किलोमीटरचा आहे, ज्याला एक्वा लाइन असेही म्हणतात.

स्टेशनचे नाव?

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस (टी २) या स्टेशनवर हे एस्केलेटर असतील.

हे ही वाचा:

वडिलांनी ३० वर्षे काम केलेल्या वसतिगृहातचं मुलाने तरुणीची केली हत्या

सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार

जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले

दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी काश्मिरी व्यापाऱ्याच्या १७ मालमत्ता जप्त

एस्केलेटरची रचना

या एस्केलेटरची उंची १९.१५ मीटर असणार आहे, जी साधारणपणे आठ मजली इमारतीच्या इतकी असेल. स्थानकावर एकूण १४ एस्केलेटर बसवण्यात येणार असून, त्यापैकी चार आधीच उभारण्यात आले आहेत. यातील ८ एस्केलेटर हे सर्वाधिक उंचीचे असतील. सर्वात मोठे आणि सर्वात उंच – एस्केलेटर कलतेसाठी आंतरराष्ट्रीय मानक ३० अंश आहे. त्यामुळे जगातील आणि देशातील जे जे सर्वात उंच एस्केलेटर आहेत ते आकारानेही, अर्थात, मोठेच आहेत.

एवढी उंची का?

२६.५ मीटर ही या विमानतळाला जोडणाऱ्या टी २ स्टेशनची खोली आहे, जे मेट्रो 3 लाईनच्या सर्वात खोल स्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे एस्केलेटरची उंची एवढी आहे. आणि हा फरक (२६.५-१९.१५) स्टेशनचा पाया आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीमुळे आहे.

Exit mobile version