भारत न्याय यात्रेत कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाला सर्वाधिक ९० लाख ८२ हजार २८६ रुपयांची देणगी मिळाली आहे. राहुल गांधी यांनीच तसे आवाहन केले होते. आज राहुल गांधी यांना सुलतानपूर न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर केल्या नंतर लगेच त्यांनी देणग्या मागणीचे आवाहन समाज मध्यमामध्ये केले आहे. आम्ही न्यायासाठी लढत आहोत. एमएसपी शेतकऱ्यांसाठी लढा, तरुणांसाठी रोजगारासाठी लढा, लोकांसाठी लोकशाहीसाठी लढा. काँग्रेसला देणगी देऊन या लढ्याला बळ द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
देणग्या मिळविणाऱ्या सर्वोच्च संस्थांमध्ये काँग्रेसचा अल्पसंख्याक विभाग आहे. त्या विभागाला सर्वाधिक ९० लाख ८२ हजार २८६ रुपयांची देणगी मिळाली आहे. त्यापाठोपाठ प्रोफेशनल्स काँग्रेसला ३९ लाख ३४ हजार २६६ रुपये, युवक काँग्रेसला २४ लाख ४६ हजार ४५१ रुपये, सेवा दलाला ८ लाख ९२ हजार ८४६ आणि ओबीसी विभागासाठी सर्वात कमी ८ लाख 32 हजार ६९५ रुपये देणगी मिळाली आहे. कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाला सर्व काँग्रेस संघटनांमध्ये सर्वात कमी देणगी मिळाली आहे. यात्रेसाठी देणगी पृष्ठावर देणगीदाराचे नाव, क्रमांक, राज्य आणि पिन कोड यासह काही मूलभूत तपशील आवश्यक आहेत. याशिवाय, देणगीदाराने कोणत्या काँग्रेस संस्थेला देणगी द्यायची आहे ते निवडण्याचा पर्याय सुद्धा आहे.
हेही वाचा..
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर
दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!
कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
.विशेष म्हणजे अल्पसंख्याक विभागाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. डिसेंबरमध्ये काँग्रेसने देशासाठी देणगी नावाची ऑनलाइन क्राउड-फंडिंग मोहीम सुरू केली. तथापि याचा फज्जा उडाला आहे. १६ डिसेंबर रोजी या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. प्रचाराच्या पहिल्या दिवशी पक्षाने १.४५ कोटी रुपये जमा केले. त्यापैकी १.३८ लाख रुपये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत.