पंतप्रधानांसाठी ९०० पोलिस अधिकारी, साडेतीन हजार अंमलदार सज्ज

पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी मुंबई सुसज्ज

पंतप्रधानांसाठी ९०० पोलिस अधिकारी, साडेतीन हजार अंमलदार सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात ९०० पोलिस अधिकारी आणि ३५६२ अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबईत शहरात कलम १४४ लागू करण्यात आलेले असून या दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करण्यावर २४ तास बंदी लावण्यात आली आहे.

तसेच मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला असून काही मार्ग बंद करण्यात आलेले असून काही मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. (तथापि, यामधून रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस व इतर बसेस यांना वगळण्यात येत आहे.)
बदल करण्यात आलेले मार्ग हे आहेत….

१) पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणान्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर

२) कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

३) खेरवाड़ी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

४) सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेशबंदी राहील.

५) संपुर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत.

हे ही वाचा:

तस्करी करण्यासाठी वापरली सोन्याची पेस्ट

बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक शोषण; विनेश, साक्षी, बजरंगकडून गंभीर आरोप

आज ‘शुभ’मन दिवस, केली डबल सेंच्युरी

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

पर्यायी मार्ग
१) पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सि.लींक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथुन धारावी टि जंक्शन वरुन कुर्ला कडे तसेच पुर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

२) संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथुन कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून पुढे कुर्लाकडे मार्गस्थ होतील.

३ )खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्न घेवुन (खेरवाडी या. वि. हद्दीत ) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथुन सरळ पुढे ( धारावी वा. चि. हद्दीत) टि जंक्शन पुढे वरून कुर्ला कडे मार्गस्थ होतील.

४) सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

५) पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील

Exit mobile version