पतियाळामध्ये एका १० वर्षांच्या मुलीने स्वतःच्या वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा केक जिथून मागवला होता, त्या बेकरीतील केकचे नमुने तपासले असता चारपैकी दोन केकमध्ये सिंथेटिक स्वीटनरचे प्रमाण अधिक आढळले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
‘आम्ही बेकरीतून चार नमुने मागवले होते. त्यातील दोन नमुन्यांमध्ये सॅकरिनचे प्रमाण अधिक आढळले,’ अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जिंदाल यांनी दिली. साखरेला पर्याय म्हणून सॅकरिनचा वापर सर्रास केला जात असला तरी याचा वापर अधिक प्रमाणात केल्याने पोटाला अपाय होऊ शकतो.
हे ही वाचा:
‘पराभवानंतर मला जिंकू असे वाटले होते’
परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू
ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश
पतियाळात राहणारी १० वर्षांची मुलगी मानवी हिचा वाढदिवस असल्याने तिच्या कुटुंबीयांनी या बेकरीतून केक ऑनलाइन मागवला होता. मात्र वाढदिवस साजरा करून हा केक खाल्ल्यानंतर मानवी आणि तिची बहीण आजारी पडली. महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. त्यानंतर या बेकरीतून केकचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर महिनाभरानंतर हा अहवाल आला आहे. मात्र मानवी आणि तिच्या बहिणीने खाल्लेल्या केकचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे डॉ. जिंदाल यांनी स्पष्ट केले.
मानवीच्या मृत्यूनंतर या बेकरीवर छापा टाकून नमुने घेण्यात आले होते. केकच्या नमुन्यातून समोर आलेली माहिती न्यायालयाला सादर करण्यात आली असून बेकरीविरोधात पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मानवीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.