‘कॅनडाच्या उच्च अधिकाऱ्याकून निज्जरच्या हत्येच्या चौकशीत अडथळे’!

भारतीय उच्चायुक्तांचा दावा

‘कॅनडाच्या उच्च अधिकाऱ्याकून निज्जरच्या हत्येच्या चौकशीत अडथळे’!

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले असतानाच आता नवी धक्कादायक बाब उघड झाली आहे. निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडामधील उच्च अधिकाऱ्यांनी अडथळा आणला, असा दावा भारताचे कॅनडामधील उच्चायुक्त संजयकुमार वर्मा यांनी केला आहे. त्यांनी ग्लोब अँड मेल या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक दावा केला.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. ‘आता निज्जर याच्या हत्येचा तपास जणू थांबलाच आहे. या हत्येमागे भारत किंवा भारताच्या एजंटचा हात असल्याचे सांगण्याचे निर्देश कोणी तरी उच्च स्तरावरील व्यक्तीनेच दिले आहेत,’ असा दावाही संजयकुमार वर्मा यांनी केला. मात्र वर्मा यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगितले नाही.

हे ही वाचा:

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!

१८ सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरसिंगच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचे पुरावे कॅनडाच्या सुरक्षा संस्थांना मिळाले आहेत, असा दावा केला होता. त्या दिवसापासून कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. भारताने कॅनडाच्या उच्चायुक्त कार्यालयांत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, अशा सूचना केल्यानंतर कॅनडाने भारतातून ४१ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे. मात्र कॅनडाने हा आरोप सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, याकडे वर्मा यांनी लक्ष वेधले. भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले असले तरी भारताला कॅनडाशी व्यापार वाढवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version