कोविड-१९ मुळे न्यायालय दोन अधिक दिवसांसाठी बंद

कोविड-१९ मुळे न्यायालय दोन अधिक दिवसांसाठी बंद

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने देखील ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत १२ एप्रिल पासून चालू होणाऱ्या आठवड्यात न्यायालय अजून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाने आता हायब्रिड प्रकारातून सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुनावणी आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारातून होणार आहे.

हे ही वाचा:

मोदींनी दिल्या आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मांची चौकशी

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

त्याबरोबरच न्यायालय प्रशासनाने, १५ आणि १६ एप्रिल रोजी देखील न्यायालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आह. न्यायालय १२, १३ आणि १४ एप्रिल रोजी बंद राहणार आहेच. गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या दिवशी न्यायालयाचे कामकाज बंद राहणार आहे. आता ही सुट्टी १५ आणि १६ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय लोकांचा कोर्टातील वावर कमी व्हावा आणि त्यायोगे कोरोना विषाणुचा प्रसार थांबावा यासाठी घेण्यात आला. त्याबरोबरच मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त आणि प्रशासन यांनी असा देखील निर्णय घेतला की सहा न्यायमुर्तींचे खंडपीठ ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही तऱ्हेने सुनावणी घेणार आहेत.

सहा एकेका न्यायाधीशाच्या खंडपीठासमोरील जामिन अर्जांच्या सुनावण्या मात्र ऑफलाईन पद्धतीनेच होतील.

Exit mobile version