महाराष्ट्र सरकारच्या समितीने १६ वर्षांच्या मुलीला आजारी वडिलांना तिच्या यकृताचा एक भाग दान करण्यास परवानगी नाकारली आहे. कारण, धोकादायक प्रक्रियेला तिने स्वतः संमती दिली की नाही याची खात्री झालेली नाही. मुलीने तिच्या आईच्याआधारे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन सरकारला यकृताचा काही भाग दान करण्याच्या परवानगीच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती.
याचिका केलेल्या मुलीच्या वडिलांच्या यकृतावर काही कारणांमुळे परिणाम झाला आहे. वडिलांना यकृताचा भाग दान करण्यास इच्छुक मुलगी एकुलती एक आहे. अवयवदान करण्यासाठी तिच्यावर भावनिक दबाव निर्माण करण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती स्वतःच्या इच्छेने तयार झाल्याबाबत कोणतीही माहिती नाही’, असे समितीने अर्ज फेटाळताना आपल्या अहवालात नमूद केले आहे.
मुलीच्या अर्जावर निर्णय घेऊन त्याची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला दिले होते. मुलीचे वकील तपन थत्ते यांनी बुधवारी न्यायमूर्ती ए के मेनन आणि एन आर बोरकर यांच्या सुटी खंडपीठासमोर अर्ज फेटाळणाऱ्या प्राधिकरण समितीचा अहवाल सादर केला. मुलगी वगळता अन्य जवळचा नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या दाता म्हणून योग्य असल्याचे आढळलेले नाही. मुलगी अल्पवयीन असल्याने अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या समितीने मान्यता दिल्याशिवाय ती वडिलांना यकृत दान करू शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
हे ही वाचा:
केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात
चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद
सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर
ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण
मुलीच्या वडीलांना अमली पदार्थांचे व्यसन असल्याने त्यांचे यकृत खराब झाले आहे. त्यामुळे त्यांची मुलगी तिच्या यकृताचा भाग दान करण्यास तयार झाली होती. मात्र मुलगी स्वतःच्या इच्छिणे तयार झालीय की नाही, हे सिद्ध झालेले नाही.