गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संप सुरू होता. अखेर इतक्या महिन्यांपासून सुरू असलेला हा संपाचा तिढा अखेर सुटला. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे महामंडळाला उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर मोठा जल्लोष केला. यावेळी एसटी कर्मचारी भावूक झाले होते. त्यांना आनंदाश्रू आवरणं कठीण झालं होतं. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे.
वारंवार सूचना करूनही संप सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. त्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी मिळावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
मेधा पाटकर यांच्यामागे लागणार ईडीचा ससेमिरा? पाटकर म्हणाल्या…
विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. तसेच २२ एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास मात्र त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.