मुंबई, ठाण्याला अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाण्याला अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

दक्षिण कोकण ते गोवा या भागात सकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून रत्नागिरीतील नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहात आहेत. उपग्रह निरीक्षणावरून कोकणात काही तास मध्यम व तीव्र सरींची शक्यता आहे, काळजी घ्या. अशा सूचना हवामान खात्याने दिल्या असून हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी तसे ट्विट केले आहे.

कोकणातील या इशाऱ्याचा मुंबईतही परिणाम दिसत असून सायंकाळी मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस कोसळत होता. रहदारीवर त्याचा परिणाम झाला. रेल्वेमार्गावर पाणी जमा झाल्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे संथगतीने धावत होत्या. यानंतरही मुंबईत पावसाचा जोर कायम राहील असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दहिसर, कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी येथे पावसाचा जोर दिसून आला. तेथील सखल भागात पाणी साचले आणि रहदारी थांबली. दहिसरच्या आनंद नग व टोलनाक्याजवळ पाणी साचले होते. मालाड सबवे, मिलन सबवे येथे पाणी जमा झाले. असाच पाऊस सुरू राहिल्यास आणखी काही ठिकाणी पाणी साचून अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड

‘मी आलो, पण यांना घेऊन आलो!’ फडणवीस यांनी लगावला टोला

कोकणपट्ट्यात पावसाने जोर पकडला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

लहानातल्या लहान माणसाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे!

 

नालासोपारा, विरार या भागातही पाऊस कोसळला. तुळींज रोड, सेंट्रल पार्क, आचोळा रोड, विरार पश्चिम येथे पाणी जमल्यामुळे वाहने अडकली. पाण्यातून जाताना अनेक वाहने बंद पडल्याच्याही घटना घडल्या.

तिकडे कोकणात राजापूरला पुराने वेढल्याचे दिसते आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपल्यामुळे राजापूर भागात पाणी शिरले आहे. अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

नवी मुंबईतही पावसाने जोर पकडला होता. तेथील खांदेश्वर रेल्वे स्थानकातच पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. लोकांना पोटरीपर्यंतच्या पाण्यातून मार्ग काढत प्लॅटफॉर्मपर्यंत जावे लागत होते. रेल्वे स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

Exit mobile version