पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील एका महिलेने परिसरात सात संशयित व्यक्ती पाहिल्यानंतर जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून जम्मूतील लष्कराच्या शाळा शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
पठाणकोटच्या फांगटोली गावातील एका महिलेने संशयित सात व्यक्तींची माहिती दिली. महिलेने सांगितले की, मंगळवारी रात्री (२४ जुलै ) सात व्यक्ती जंगलातून माझ्या दारात आले आणि माझ्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर घरात कोण-कोण आहे, नवरा कुठे काम करतो, घरी एकटीच असतेस का?, अशी विचारणा त्यांनी केली. या सातही जणांच्या पाठीवर मोठ्या बॅग होत्या. ते सातही जण जंगलाच्या दिशेने जात असताना सारखे-सारखे मागे वळून पाहत होते, असे महिलेने सांगितले.
हे ही वाचा:
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश
पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!
कमला हॅरिस म्हणाल्या, ‘इस्रायल-गाझा’ युद्धावर गप्प बसणार नाही !
गौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा !
यानंतर महिलेने गावकऱ्यांना याची पहिला माहिती दिली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. महिलेच्या माहितीच्या आधारे पोलीस आणि सेनाने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. महिलेची चौकशी केल्यानंतर एका संशयिताचे स्केच तयार करण्यात आले आहे. हे स्केच सर्वत्र प्रसारित करण्यात आले असून हा व्यक्ती आढळून आल्यास माहिती देण्यास पोलिसांनी सांगितले आहे. तसेच रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करण्यास सांगितले आहे. खबरदारी म्हणून जम्मूतील लष्कराच्या शाळा शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.