अलीकडेच आपली पत्नी करीना कपूर आणि कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणारा अभिनेता सैफ अली खान याने पंतप्रधानांशी झालेल्या संवादाबद्दल खुलासा केला आहे. ५४ वर्षीय अभिनेत्याने या बैठकीचे वर्णन ‘विशेष’ म्हणून केले आणि म्हणाले, ‘ते (पंतप्रधान मोदी) संसदेतून एका दिवसानंतर आले, त्यामुळे मला वाटत होते की ते थकले असतील. पण, त्याउलट झाले. भेटी दरम्यान, त्यांचे आमच्या सर्वांकडे लक्ष होते, चेहऱ्यावर स्मित हास्य अन तेज होते.
राज कपूर चित्रपट महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबाने ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. चित्रपट महोत्सवाचे आयोजन १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. या काळात राज कपूरचे चित्रपट ४० शहरे आणि १३५ चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले होते. यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्टपासून ते करिश्मा कपूर, करीना कपूर आणि सैफ अली खानपर्यंत सर्वजण उपस्थित होते.
हे ही वाचा :
‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’
बांगलादेशांत काली माता मंदिराची तोडफोड
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक विलंबाने !
अतुल सुभाष प्रकरण, पत्नीसह सासरच्या मंडळींना अटक!
या भेटीवर हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अभिनेता म्हणाला, त्यांनी माझ्या पालकांबद्दल वैयक्तिकरित्या विचारले. भेटीसाठी आपल्या मुलांना आणले असावे असे त्यांना वाटले होते. माझ्या पत्नीने सांगितल्यानंतर आमच्या मुलांसाठी त्यांनी एका कागदावर स्वाक्षरी दिली.
ते पुढे म्हणाले, मला असे वाटते की ते देश चालवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि या पातळीवर जोडण्यासाठी वेळ घेत आहेत. मी त्यांना विचारले की, तुम्हाला किती तास विश्रांती मिळते. यावर ते म्हणाले, रात्री तीन तास. माझ्यासाठी हा दिवस खास होता, असे अभिनेत्याने सांगितले. आम्हाला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि कुटुंबाचा इतका आदर केल्याबद्दल आभारी असल्याचे सैफ अलीखानने म्हटले.