बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप

बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप

भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांपैकी एक म्हणजे क्रिकेट! पण याच क्रिकेट वरून आता एक नवा वादंग सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय क्रिकेट नियमन मंडळ अर्थात बीसीसीआय वर एका माजी क्रिकेटपटूने गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे हा माजी खेळाडू भारतीय क्रिकेटपटू नसून दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज माजी फलंदाज हर्षल गीब्स याने भारतीय क्रिकेट नियमन मंडळावर आरोप केले आहेत. बीसीसीआय आपल्याला धमकावत असल्याचा आरोप गीब्स यांनी केला आहे. हे सर्व वादग्रस्त प्रकरण काश्मिर प्रीमियर लीगशी संबंधित आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गीब्स हा आगामी काळात होऊ घातलेल्या काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून खोडसाळपणे सुरू करण्यात आलेल्या या लीगला भारताने पहिल्यापासून विरोध केला आहे. यातच आता हर्षल गीब्स याने केलेल्या नव्या आरोपामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.

हे ही वाचा:

राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?

‘आपण जर काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळलो तर मला क्रिकेट संबंधातील कोणत्याही कामासाठी भारतात प्रवेश मिळणार नाही’असे भारतीय क्रिकेट मंडळातर्फे धमकावण्यात येत आपण जर काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळलो तर मला क्रिकेट संबंधातील कोणत्याही कामासाठी भारतात प्रवेश मिळणार नाही असे भारतीय क्रिकेट मंडळ तर्फे धमकावण्यात येत असल्याचे गीब्स यांनी म्हटले आहे. बीसीसीआय कारण नसताना खेळात राजकारण आणू पाहत असल्याचा आरोप गीब्स यांने केलाआहे.

गीब्सच्या या आरोपांना पाकिस्तानकडूनही खतपाणी घातले जात असून शाहिद अफ्रिदी सारखे पाकिस्तानी खेळाडूही त्याच्या समर्थनात उतरलेले दिसत आहेत.

Exit mobile version