ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !

ड्रग्ज तस्करांचा शोध सुरु 

ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !

पंजाब पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेवर सीमेपलीकडून पाठवण्यात आलेली ड्रग्जची खेप जप्त करत मोठे यश मिळविले आहे. पंजाब पोलिसांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) संध्याकाळी उशिरा ही कारवाई केली. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी सीमावर्ती गावे कामस्के आणि मंज गावात केलेल्या दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये १० किलो हेरॉईन जप्त केले आहे. ड्रग्जची करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला, जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल ५० कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली. ते म्हणाले, पाकिस्तानमधून अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा संबंध पाकिस्तानातील तस्करांशी आहे. दरम्यान, सीमेपलीकडून ड्रोनमार्फत आलेल्या ड्रग्जची खेप घेण्यासाठी कोणीही तस्कर आला न्हवता, तत्पूर्वी पोलिसांनी कारवाई करत ड्रोनसह ड्रग्ज जप्त केले.

हे ही वाचा : 

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

बाणडोंगरी डीपी रोड; भातखळकरांची आणखी एक वचनपूर्ती

रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

दगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

या प्रकरणी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तस्करांच्या शोधासाठी मागील गुन्ह्यांच्या नोंदीचा तपास सुरु केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version