हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

भाजपचा मोठा दावा

हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत, असा दावा भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी सोमवारी केला. सोरेन यांनी त्यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे समर्थक आणि अन्य आमदारांना रांची येथे त्यांच्या बॅगा आणि सामानासह बोलावले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारीच सोरेन यांच्या घरी जाऊन त्यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्याने हा दावा केला आहे.‘हेमंत सोरेन यांनी त्यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि अन्य आमदारांना रांची येथे सामान आणि बॅगांसह बोलावले आहे. माहितीनुसार, ते कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव मांडतील. ईडीच्या चौकशीच्या भीतीने ते सध्या रस्त्यावरून प्रवास करतानाच बोलत असून रांची येथे पोहोचल्यानंतरच त्यांच्या आगमनाबाबत सांगतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, ’ असे दुबे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. सोरेन यांना ईडीच्या चौकशीची भीती वाटत असल्याचेही दुबे सांगत आहेत.

हे ही वाचा:

एलॉन मस्क शिरले मानवाच्या मेंदूत!

आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी

‘स्थगिती, लांबलचक सुनावण्यांमुळे निकालांना उशीर’

हेमंत सोरेन यांनी २७ जानेवारी रोजी दिल्ली येथे प्रयाण केले होते. तेव्हा ते त्यांच्या काही वैयक्तिक कामासाठी तेथे गेले असून ते लवकरच परततील, असे त्यांच्या पक्षाच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र भाजपच्या झारखंड युनिटच्या मते मुख्यमंत्री ईडीच्या चौकशीच्या भीतीने गेल्या १८ तासांपासून फरार आहेत. त्यामुळे झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना केले आहे.
ईडीने सोरेन यांना गेल्याच आठवड्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी २९ किंवा ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. त्यानंतर सोरेन यांनी ३१ जानेवारीला दुपारी एक वाजता त्यांच्याच घरी ईडीच्या चौकशीसाठी तयारी दर्शवली होती.

Exit mobile version