हेमंत सोरेन बनले झारखंडचे मुख्यमंत्री, चौथ्यांदा घेतली शपथ!

सोहळ्याला इंडी आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित

हेमंत सोरेन बनले झारखंडचे मुख्यमंत्री, चौथ्यांदा घेतली शपथ!

हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रांचीच्या मोराबादी मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हेमंत सोरेन यांच्यासह सहा ते आठ जण मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, हेमंत सोरेन यांच्याशिवाय एकाही आमदाराने मंत्री पदाची शपथ घेतली नाही. हेमंत यांच्या शपथविधीला त्यांचे वडील आणि तीन वेळा माजी मुख्यमंत्री शिबू सोरेनही उपस्थित होते. या सोहळ्याला इंडी आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह अनेक नेते उपस्थित होते.

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षाच्या सुरुवातीला अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी मारत पुनरागमन केले. हेमंत  सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम), काँग्रेस, आरजेडी आणि सीपीआय-एमएल यांच्याशी आघाडी करून विधानसभेच्या ८१ पैकी ५६ जागा मिळवल्या. ८१ पैकी जेएमएमला ३४, भाजपाला, २१, काँग्रेसला १६, आरजेडीला ४, सीपीआय-एमएलला २ जागा मिळाल्या.

हे ही वाचा : 

भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रवांडातून भारतात आणला!

एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

संभलमध्ये हिंसाचारादरम्यान अचानक मोठ्या संख्येने लोक शस्त्रे घेऊन कसे पोहचले?

आम्हाला संसद चालवायची आहे

 

Exit mobile version