झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवास्थानी ईडीचे पथक दाखल!

निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवास्थानी ईडीचे पथक दाखल!

जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सोरेन यांच्या चौकशीसाठी ईडीचे एक पथक दक्षिण दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी दाखल झालं आहे.यावेळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून त्यांना अटकही होऊ शकते, अशी माहिती आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीकडून मुख्यमंत्री सोरेन यांना नववे समन्स जारी करून त्यांना २९ किंवा ३१ जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले होते.तसेच चौकशी साठी हजर झाला नाहीत तर ईडीचे पथक तुमच्या घरी चौकशीसाठी हजर राहील, असे ईडीकडून समन्समध्ये सांगण्यात आले होते.ईडीकडून समन्स जारी झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन रविवारी दिल्लीला रवाना झाले होते.दिल्लीहून परत आल्यानंतर मुख्यमंत्री सोरेन यांनी अथवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून ईडीच्या कारवाईबाबत दुजोरा दिला नाही.आज अखेर ईडीचे पथक मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहे.

हे ही वाचा:

फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

‘ऍनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर, आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!

इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!

तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. दक्षिण छोटेनागपूरचे तत्कालीन आयुक्त नितीन मदन कुलकर्णी यांच्या अहवालाच्या आधारे ईडीचा तपास चालू आहे.ही चौकशी लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे.झारखंडमध्ये बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे लष्कराची जमीन विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रांची महापालिकेत एफआयआर दाखल करण्यात आला होता. याच एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. हेमंत सोरेन यांच्या कुटुंबाचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी ईडीने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींमध्ये प्रदीप बागची, अफसर अली, सद्दाम हुसेन, इम्तियाज अहमद, तल्हा खान, फैयाज खान, भानू प्रताप प्रसाद, छवी रंजन, आयएएस (माजी डीसी रांची) दिलीप कुमार घोष, अमित कुमार अग्रवाल, विष्णू कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे.

Exit mobile version