सांगली सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत हेमंत शिंदे यांच्यासह १४ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. हेमंत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सांगली सहकारी बँकेची १९६४ साली स्थापना करण्यात आली. त्यावेळी शिवाजीराव शिंदे हे सांगली सहकारी बँके संस्थापक होते. हेमंत शिंदे यांचे हे वडिल. सांगली सहकारी बँकेचे २७,००० सभासद आहेत. या निवडणुकीत सांगली सहकारी बँकेच्या संचालकपदी हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवडणूक आले आहेत.
हेमंत शिंदे आणि सांगली सहकारी बँक हे अनोखे नाते आहे. त्यांचे वडिल शिवाजीराव शिंदे हे सांगली सहकारी बँकेचे १९६४ सालापासून २०१० पर्यंत संस्थापक होते. त्यांनी या बँकेसाठी आपले आयुष्यच वेचले असेच म्हणावे लागेल. त्यांनी आपल्या काळात या बँकेसाठी मोठमोठे निर्णय घेऊन सांगली सहकारी बँकेला सोन्याचे दिवस आणले. आज ही बँक करोडोंची उलाढाल करतेय. मुंबईत सांगली सहकारी बँकेच्या दादर, मालाड, विक्रोळी, गोवंडी आणि गिरगाव अशा पाच ठिकाणी शाखा आहेत.
आज या बँकेच्या संचालकपदी शिवाजीराव शिंदे यांचे पुत्र हेमंत शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत. मूळचे बांधकाम व्यावसायिक, इंजीनिअर असलेले हेमंत शिंदे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. बँकेच्या विस्तारासाठी काम करणार, रिकव्हरी करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि तशीच पावले टाकली जातील, कमी वेळेत योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
नवज्योत सिद्धू १० महिन्यांनी तुरुंगातून बाहेर
स्थापना दिवस साजरा करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु
भारत-इस्रायल देणार दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी दिशा
संजय राऊत याना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस
सांगली सहकारी बँक ही याआधी सांगली जिल्हा कामगार को. ऑ. बँक या नावाने ओळखली जायची. या बँकेचा आजूबाजूचा परिसर हा पान बाजार या नावाने ओळखला जायचा. तिथे व्यापार चालायचे. त्यासोबत या परिसरात मिल कामगार म्हणजेच गिरणी कामगारांची संख्या जास्त होती. सांगली जिल्ह्यातून उद्योग-व्यावसायासाठी मुंबईत आलेल्या ग्राहकांसाठी ही बँक आशेचा किरण ठरली. या कामगार आणि व्यापारी ग्राहकांसाठी या बँकेचा उदय झालाय. मोठ्या संख्येने सांगलीतून आलेल्या ग्राहकांनी या बँकेत आपले खाते उघडले. कालांतराने गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार मुंबईतून हद्पार झाला. काळाबरोबर बदल करायला पाहिजे, प्रगतीसाठी बदल हे अपेक्षित असतात आणि ते करायलाच पाहिजे, हेच उद्दिष्ट समोर ठेवून सांगली सहकारी बँकेने कात टाकली आणि आज ही बँक यशोशिखरावर जाऊन पोहोचली आहे.